उदयनराजेंच्या उपस्थितीत होणार सीमोल्लंघन पारंपारीक वेशभूषेत शिवप्रेमींनी उपस्थित रहावे :सुनील काटकर

सातारा येथे येत्या शाही सीमोल्लंघन सोहळ्याच्या नियोजनासाठी कनिष्क मंगल कार्यालय येथे बैठक पार पडली. दसरा सोहळा देखण्या स्वरूपात पार पडावा, यासाठी शासनस्तरावर तसेच शिवप्रेमींच्या सूचनांवर आधारित नियोजन करण्यात आले. या बैठकीत सर्व उपस्थितांना आपले विचार मांडण्याची संधी देण्यात आली. त्यानुसार सीमोल्लंघनाची जय्यत तयारी करण्यात आली असून हे सीमोल्लंघन खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत होणार असल्याने सर्व शिवप्रेमींनी व नागरिकांनी पारंपारीक वेशभूषेत उपस्थित रहावे, असे आवाहन सातारा लोकसभा मतदारसंघ संयोजक व शिवप्रेमी सुनील काटकर यांनी केले.या बैठकीत मावळ्यांनी सोहळा अधिक आकर्षक व्हावा यासाठी विविध सूचना मांडल्या. शासन व संयोजन समितीने त्या सूचनांचे एकत्रिकरण करून कार्यक्रमाचे रूपरेषा निश्चित केली आहे. दसरा मेळावा व सीमोल्लंघन सोहळा पोवईनाका, सातारा व जलमंदिर येथे खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यामुळे या सीमोल्लंघन सोहळ्यास सर्वांनी पारंपारीक पोशाखात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सुनील काटककर यांनी केले.”दसरा मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा. पारंपरिक पोशाख व फेटे घालून उपस्थित राहिल्यास शाही सोहळ्याला अधिक देखणेपणा येईल. सर्व शिवप्रेमींनी या ऐतिहासिक सोहळ्याला हजेरी लावावी.”रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील मोझर म्हणाले,”आमचे दैवत खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले हे प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही दसरा सीमोल्लंघन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे सर्वांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून, जल्लोषात हा ऐतिहासिक सोहळा साजरा करूया.”या सीमोल्लंघन सोहळा बैठकीस शिवछत्रपती उदयनराजे मित्र समूहाचे कार्यकर्ते शिवप्रेमी, तसेच सातारकर बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *