सातारा शाही दसऱ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

सातारा येथील शाही दसरा महोत्सवास राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याबाबत भाजप जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोजदादा घोरपडे, आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या मागणीवर आज मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ राज्य महोत्सव दर्जा देण्याची ग्वाही दिली.महायुतीचे जिल्हा समन्वयक सुनिल काटकर तात्या यांनी संबंधित मागणीचे पत्र घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यापूर्वीच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी या महोत्सवासाठी पर्यटन व जिल्हा नियोजन समितीमार्फत भरीव निधी देण्याच े आश्वासन दिले होते. तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी देखील या उपक्रमासाठी मदत केली.या भेटीत सुनिल काटकर तात्या यांच्यासोबत काका धुमाळ, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रावण जंगम, तेजस जगताप, सोशल मीडिया जिल्हा संयोजक रविंद्र लाहोटी, प्रवीण कणसे उपस्थित होते.साताऱ्याच्या ऐतिहासिक शाही दसऱ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *