गोवंश हत्या रोखण्यासाठी सकल मराठी मुस्लिम समाजाचे साताऱ्यातील कुरेशी समाजाच्या कत्तल खाण्यातील प्रमुखांना निवेदन

सकल मराठी मुस्लिम समाज आणि मी मुस्लिम मावळा छत्रपतींच्यावतीने चा यांच्यावतीने कुरेशी समाजाच्या कत्तल खाण्याला भेट देत प्रमुखांना निवेदन दिले आणि जिल्हा प्रशासनाला भेटून निवेदनाद्वारे बकरी ईदचे औचित्य साधून होणारे गैरप्रकार रोकण्याची विनती करण्यात आली. गोवंशहा विषय बकरी ईद आल्यावरच जिव्हाळ्याचा दाखविला जात असून ह्याच्या माध्यमातून चुकीचे प्रकार सुद्धा चालतात का ह्याची माहिती घ्यावी अशी मागणी प्रशासनाला देण्यात आली. रस्त्यावर फिरणाऱ्या भाकड गोवंशासंदर्भात योग्य ती पाऊले उचलत प्रशासनाने गोशाळा काढाव्यात आणि चालवाव्यात ज्यामुळे शेतकऱ्याला जड झालेला भाकड गोवंश सरकारी गोशाळेत जाईल व शेतकऱ्याला अशी जनावरे कसायला विकायची नामुष्की येणार नाही आणि त्यामुळे गोवंश हत्येचे गुन्हे कमी होतील. जर शेतकऱ्याने भाकड गोवंश किंवा कोणताही गोवंश विकलाच नाही तर कसायाकडे कापायला गोवंश येणारच नाही आणि हया सर्व बाबींचा विचार करून गोवंश हत्या थांबवण्यासाठी गोवंश विक्री करणाराला सुद्धा मोक्का लावावा अशी मागणी सकल मराठी मुस्लिम समाज व मी मुस्लिम मावळा छत्रपतींचाच्यावतीने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *