
सातारा : शिवसेनाप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व शिवसैनिकांना पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढे येण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचे पालन करत शिवसेना नेते,सातारा जिल्हा पालकमंत्री शंभुराजे देसाई साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा मतदारसंघ,जावली विधानसभा मतदारसंघ,आणि शिवसेना सातारा शहर यांच्या वतीने जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी एक लाख अकरा हजार रुपयांचा (1,01,000) धनादेश आज सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेनेकडून उचलण्यात आलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. हा धनादेश सुपूर्द करताना शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने शिवसेना सहसंपर्कप्रमुख एकनाथ दादा ओंबळे, सातारा उपजिल्हाप्रमुख विकास अण्णा शिंदे, तालुका प्रमुख समीर गोळे, आणि शिवसेना शहरप्रमुख निलेश मोरे यांचा समावेश होता. यावेळी त्यांच्यासोबत ओबीसी सेल शहरप्रमुख पवित चोरगे, शहरसंघटक अमोल इंगोले, किरण कांबळे, उपशहरप्रमुख अजिंक्य राजपूत,अमोल खुडे, विक्रम यादव, सयाजी शिंदे, ओंकार बर्गे, सोपान चिकने, सचिन वाईदंडे, आझाद मुलानी,फलटण तालुका प्रमुखहेमंत सुतार, रामवाडी सरपंच श्रीरंग गलगले, युवा सेना सुधीर करंदकर आदी शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते. यावेळी निलेश मोरे म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी तत्परता दाखवली आहे. यापुढे देखील आम्ही अशा कठीण परिस्थितीत समाजाला मदत करण्यास आम्ही अग्रेसर राहू. तसेच यापुढे सातारा जिल्ह्यात कोणत्याही नागरिकांना काही अडचण असल्यास शिवसैनिक मदत करून दिलासा देण्याचा प्रयत्न करत राहील.