पोवई नाका परिसरातील ‘कॅफे फॉर यू’ वर पोलिसांची धाड; कॅफेच्या नावाखाली लॉजसदृश व्यवसाय ?

सातारा शहरातील पोवई नाका परिसरात, बाटा शोरूम नजीक असलेल्या ‘कॅफे फॉर यू’ या कॅफेवर सातारा शहर पोलिसांनी आज अचानक धाड टाकून कारवाई केली. या कॅफेमुळे HB कॉम्प्लेक्समधील नागरिकांना प्रेमविगुल तसेच कपल्सच्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणावर त्रास होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पोलिसांकडे प्राप्त होत होत्या.मिळालेल्या माहितीनुसार, सदर कॅफेमध्ये प्रत्यक्षात खाणे-पिण्याचा व्यवसाय न करता, आत अंधार ठेवून बॉक्स पद्धतीने बेडसदृश्य सोफा तयार करण्यात आले होते.

कॅफेच्या नावाखाली वेगळाच संशयास्पद व्यवसाय सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकारामुळे परिसरात गैरप्रकारांना खतपाणी मिळत असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली होती.नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत सातारा शहर पोलिसांनी आज अचानक छापा टाकून कॅफेची सखोल तपासणी केली.

तपासादरम्यान हे ठिकाण कॅफे म्हणून कार्यरत नसून लॉजसारख्या पद्धतीने चालवले जात असल्याचे उघड झाले आहे.दरम्यान, या प्रकरणी संबंधित कॅफे चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, अशा बेकायदेशीर प्रकारांवर यापुढेही कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *