
कोरेगाव ते वाठार हा रस्ता पाच ते दहा फुटाणे खोदून ठेवलेला आहे या पावसाळ्यात शेकडो जणांचे अपघात झालेले असून, कोरेगाव पोलीस स्टेशन मधील महिला कर्मचारी यांचा हात मोडला गंभीर दुखापत झाली, गर्भवती महिला गाडीवरून घसरून पडली, वयस्कर लोके, तरुण असे दररोज अपघात सत्र चालू आहे. याला सर्वस्वी जबाबदार शिव समर्थ कंपनी आहे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते हेच कळायचं बंद झालेला आहे. संपूर्ण रस्ता खोदून ठेवलेला आहे त्याला सेफ्टी फॅक्टर्स कसल्याही पद्धतीच्या नाहीत, सुरक्षतेसाठी दिशा फलक लावणे गरजेचे आहे, रोड सेफ्टी रिप्लेक्टर, बेरिकेटिंग टेप, खूप ठिकाणी मोठ्या खड्ड्यात पाणी साचलेला आहे त्यामुळे खड्डा किती मोठा आहे हे कळत नाही. रस्त्यावरच्या चिखलामुळे शेकडो गाड्या घसरून पडतात त्यात गंभीर दुखापत होते यामध्ये कुणाच्या जीवित नुकसान झाले आहे का याची माहिती घ्यावी लागेल. परंतु नागरिकाच्या जीविताशी आपण खेळू नये, सातारा पंढरपूर रस्त्याला मेघा इंजीनियरिंग कंपनीच्या कृपेने 61 अपघातात नागरिक मृत्युमुखी पावले आता कोरेगाव ते वाठार रस्त्याला किती नागरिकांचा बळी घेणार ? हा विषय अतिशय महत्त्वाचा व गंभीर आह े तरी, सदर कॉन्ट्रॅक्टर वर त्वरित कारवाई करा त्यांना काम करायचे नसेल तर ब्लॅक लिस्टमध्ये टाका जर आपल्याकडे पुरेशी यंत्रणा नव्हती तर पूर्ण रस्ता खोदला कशासाठी एक बाजूचा रस्ता तसाच ठेवून दुसऱ्या बाजूचा रस्ता करणे गरजेचे होते परंतु असे न करता संपूर्ण रस्ता खोदून हजारो लोकांच्या जीविताशी खेळत असलेल्या कॉन्ट्रॅक्टर वर चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन करणार असल्याचे निवेदन रमेश उबाळे यांनी सातारा जिल्हाधिकारी यांना दिले आहे..