
जिल्ह्याच्या वाहतूक विविध संघटना आहेत यामध्ये काळी पिवळी टॅक्सी संघटना, रिक्षा संघटना, ट्रान्सपोर्ट संघटना यांसारखे विविध संघटनांच्या विविध समस्या आहेत या समस्यांना वाचा फोडण्यासाठी प्रकाश शेळके यांनी शर्तीचे प्रयत्न केले आहेत तसेच सातारा जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिकाला न्याय देण्याची काम देखील केले आहे या संपूर्ण कार्याचे फळ म्हणूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उपनेते आनंदराव जाधव यांच्या शिफारसीनुसार अवजड वाहतूक सेना महाराष्ट्र अध्यक्ष इंद्रजीत बल यांच्या वतीने “सातारा जिल्ह्याचे सुपुत्र कट्टर शिवसैनिक प्रकाश शेळके यांना अवजड वाहतूक सेनेच्या सातारा जिल्हाध्यक्ष” पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यावेळी इंद्रपाल मारवा महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अवजड वाहतूक सेना, रीना खुराणा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अवजड वाहतूक सेना, गणेश पुगांवकर महाराष्ट्र राज्य सचिव अवजड वाहतूक सेना, सातारा जिल्हा उपप्रमुख कुणाल अरुण चव्हाण, उपजिल्हाप्रमुख आणि फलटण तालुका अध्यक्ष सचिन शिंदे सरकार, जिल्हा सचिव अवजड वाहतूक सेना अजय दिनकर माळी, सुनील राजेंद्र शेळके तालुकाध्यक्ष सातारा यांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाचा प्रकाश शेळके योग्य वापर करून वाहतूक संघटनेतील कामगार चालक-मालक यांना योग्य तो न्याय देतील तसेच आपल्या कार्यकर्तृत्वाने सातारा जिल्ह्यात नवीन नेतृत्व तयार करतील अशी आशा आहे.