
जगात सर्वप्रथम ‘इथे’ झाले नववर्षाचे आगमन!
३१ डिसेंबरच्या मध्यरात्री जगभर नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाते. मात्र हे स्वागत सर्वत्र एकाच वेळी होत नाही. पृथ्वीचे फिरणे आणि आंतरराष्ट्रीय तारीख रेषा यांमुळे नवीन वर्षाचा क्षण जगभर टप्प्याटप्प्याने जवळपास २६ तासांत येतो. या नववर्षाच्या उलटसुलट प्रवासाची सुरुवात होते प्रशांत महासागरातील किरिबाती देशातून.
किरिबातीमधील किरितीमाती (Christmas Island)
आंतरराष्ट्रीय तारीख रेषेजवळ असलेल्या या बेटावर ३१ डिसेंबरची मध्यरात्र जगात सर्वांत आधी होते. दूरवरच्या या बेटावर स्थानिक नागरिक पारंपरिक पद्धतीने, शांत आणि साध्या वातावरणात नववर्षाचे स्वागत करतात. जगभरातील देशांसाठी हा क्षण नववर्षाच्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो.
किरिबातीपासून सुरू झालेला हा नववर्षाचा प्रवास हळूहळू आशिया, युरोप, आफ्रिका आणि अखेर अमेरिकेपर्यंत पोहोचतो.
जगात सर्वप्रथम उगवलेले नववर्ष — तेही प्रशांत महासागरातील एका छोट्या बेटावर!