पंचायत समित्यांमध्ये भाजपाची मुसंडी; फलटणच्या निकालाने सर्वांच्या भुवया उंचावल्या!

फलटण पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत आज मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का देत भाजपने सत्ता आपल्या ताब्यात घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन सदस्यांना आपल्या बाजूला वळवून भाजपने राजकीय खेळी यशस्वी केली. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या रणनीतीमुळे भाजपला पंचायत समितीवर सत्ता मिळवण्यात यश आले.

इतकंच नव्हे तर माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शिवसेना शिंदे गटातील एका सदस्यालाही भाजपने आपल्या गोटात खेचले. या घडामोडींमुळे समीकरण बदलले आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने एक पाऊल मागे घेत उपसभापती पद स्वीकारले.

यानंतर भाजपच्या शिवांजली भोसले यांची फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली.

या विजयानंतर पंचायत समितीच्या बाहेर भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. तब्बल तीस वर्षांनंतर पंचायत समितीवर आपल्या विचाराचा सभापती बसवण्यात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची रणनीती यशस्वी ठरली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. जिल्हा पंचायत समिती निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक यश मिळवत सातारा जिल्ह्यात सत्तासंघर्षाचे चित्र बदलले आहे. एकूण ११ पंचायत समित्यांपैकी भाजप ५, राष्ट्रवादी ५ आणि शिवसेना १ अशा जागांवर वर्चस्व निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात पहिल्यांदाच भाजपला एवढे मोठे यश मिळाले असून, दोन बड्या मंत्र्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. विशेषतः फलटणमधील अनापेक्षित निकालाने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत भाजपने मारलेली ही मुसंडी जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरणार आहे.

सातारा जिल्ह्यातील11 पंचायत समिती पक्षनिहायक आकडेवारी :-

राष्ट्रवादी एकूण – 5
भाजपा एकूण – 5
शिवसेना एकूण- 1

सातारा जिल्ह्यातील 11 पंचायत समितीच्या सभापती निवडीचा निकाल..

फलटण – सभापती भाजप – शिवांजली भोसले
शिवसेना उपसभापती – गणेश सस्ते

पाटण – शिवसेना सभापती – सविता पवार
शिवसेना उपसभापती – विजय पवार

मेढा जावळी – सभापती भाजप – सौरभ शिंदे
उपसभापती भाजप – गोरख महाडीक

कराड – भाजपा सभापती -नंदाताई यादव
उपसभापती – भाजपा – अनिता यादव

महाबळेश्वर – राष्ट्रवादी– चोरमळे- सभापती
शिवसेना – उपसभापती – संजय मोरे

सातारा – भाजपा सभापती -महेश गाडे
उपसभापती -सुषमा जाधव.

कोरेगाव-राष्ट्रवादी सभापती -रूपाली गुरव
राष्ट्रवादी उपसभापती -रवींद्र पवार

माण,दहिवडी – सभापती – राष्ट्रवादी विक्रम शिंगाडे
उपसभापती राष्ट्रवादी – प्रियंका जगदाळे.

वाई -सभापती राष्ट्रवादी – विक्रांत डोंगरे
उपसभापती राष्ट्रवादी – वर्षा जगताप

खटाव सभापती भाजप– वनीता दुबळे
उपसभापती भाजप – रेश्मा शेडगे

खंडाळा-राष्ट्रवादी सभापती -छायाताई जाधव
राष्ट्रवादी उपसभापती – संतोष वीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *