महामार्गावर बोपेगाव जवळ गॅस टँकरने अचानक घेतला पेट.

पुणे बंगळूरु महामार्गावर बोपेगाव जवळ गॅस टँकरने अचानक पेट घेतला आहे मात्र सुदैवाने टँकर रिकामा असल्याने मोठी दुर्घटना टळली मात्र.या आगीत गॅस टँकर जळून खाक झाला आहे.या घटनेच्या ठिकाणी धुराचे लोट आणि अग्नीच्या ज्वाळा यामुळे तासभर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पुणेच्या दिशेने जाणाऱ्या गॅस टँकरने बोपेगाव पुला शेजारी अचानक पेट घेतला.पहाता पहाता आगीचे रुद्र रूप आणि ज्वाळा धुराचे लोट यांनी भयानक परिस्थिती निर्माण झाली पण त्याही वेळी चालक यांनी टँकर रस्त्याच्या बाजूला सेवा रस्त्यावर घेत मदतीला इतर लोकांना बोलवू लागले सुदैवाने सदर टँकर रिकामा होता त्यामुळे मोठी होणारी दुर्घटना टळली तरी सुद्धा अग्निशमन गाडी येईपर्यंत टँकर जळून खाक झाला होता.या महामार्ग पोलीस केंद्र जोशीविहिर येथे अग्निशमन विजवणारी यंत्रणा असावी अशी अनेक वर्षांपासून मागणी आहे मात्र आणेवाडी टोलनाका व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *