“आम्ही गद्दारी केली असती तर विधानसभा निवडणुकीत अपक्ष सत्यजित पाटणकरांची रिक्षा आम्ही पलटी केली नसती” – मंत्री शंभूराजे देसाई

साताऱ्यातील दोन्ही राजेंच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केलेले सत्यजित पाटणकर यांनी शिंदे गटाचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली होती.शंभूराज देसाई यांनी पक्षाशी गद्दारी करून सुरत मार्गे गुवाहाटी पळून गेले अशी खोचक टीका पाटणकर यांनी केली होती याला देसाई यांनी उत्तर दिलं आहे.मी या पक्ष प्रवेशा बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहे.आम्ही कधीही गद्दारी केली नाही जो शिवधनुष्य बाण 1997 बाळासाहेब ठाकरे यांनी दिला तो आजही माझ्या हातात आहे .उलट सत्यजित पाटणकर यांनीच आत्ता पर्यंत अनेक पक्ष बदलले आहेत.त्यांनी काँग्रेस ,राष्ट्रवादी पुन्हा अपक्ष परत मशाल आणि आता कमळ हातात घेतले आहे.आम्ही गद्दारी केली असती तर विधानसभा निवडणुकीत अपक्ष सत्यजित पाटणकरांची रिक्षा आम्ही पलटी केली नसती अशी खोचक टीका करत पाटणकरांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *