महाबळेश्वर सह पाचगणीकरांची तहान भागवणा-या वेण्णामाईची ओटी भरण कार्यक्रम

प्रतिनिधी : शानपरवेज डांगे

महाबळेश्वर: महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर आणि पाचगणी शहरांची जीवनदायिनी असलेला वेण्णा तलाव शनिवारी पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला आहे. विशेष म्हणजे, यावर्षी जून महिन्यातच वेण्णा तलाव भरल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे, कारण यामुळे महाबळेश्वर आणि पाचगणीकरांची वर्षभराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.आणि वेण्णा माईचे ॠण व्यक्त करण्यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही महाबळेश्वर नगरपालिकेच्या वतीने वेण्णामाईच्या ओटीभरणाचा कार्यक्रम वेण्णा लेक येथे करण्यात आला.यावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेविका, विमलताई ओंबळे, शारदा ढाणक, सुरेखा आखाडे यांच्या हस्ते परडी सोडून वेण्णा माईची पुजा करण्यात आली.यावेळी माजी नगराध्यक्ष किसनसेठ शिंदे,माजी नगरसेवक सुनील शिंदे अर्बन बँक संचालक शरद बावळेकर , रोहित ढेबे मुख्य लिपिक,आबा ढोबळे तसेच बोट क्लब लिपिक विठ्ठल जाधव, अरुण बावळेकर,टि.के. शारवान, ,हम्ज़ा महाबळे,बासिद डांगेउमेश रोकडे,जमीर शारवान ,, व पत्रकार बंधू ई.उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *