मुस्लिम मायनॉरिटी ही राजकीय अनाथ असल्यासारखी अवस्था झाली आहे, MMNF आयोजित बैठकीत चर्चा

महाराष्ट्र राज्यामध्ये मागील ३ वर्षामध्ये मुस्लिमांवर होत असलेले हल्ले , थांबलेला विकास, आर्थिक बहिष्कार व सर्वच क्षेत्रामध्ये असलेल्या अडचणी व आव्हाने यांच्यावर लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत चिंतन करण्यात आले . सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते सादिकभाई शेख यांनी मुद्दा मांडला की मुस्लिम समाजावर होत असलेले धार्मिक , आर्थिक , शारीरिक , सामाजिक हल्ले पाहता अपवाद वगळता सत्ताधारी व विरोधक कोणीही मुस्लिम समाजाच्या पाठीशी उभे राहत नाहीत व सहकार्य करत नाहीत त्यामुळे शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या क्रांतिकारी महाराष्ट्रात मुस्लिम समाज हा राजकीय अनाथ झाला असल्यासारखी अवस्था आज झालेली आहे त्यामुळे मुस्लिम समाजाला येणाऱ्या काळात खूप धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील आणि जो आमच्या अडचणीत आमचा त्याच्याच पाठीशी उभे राहावे लागेल. महाराष्ट्रात सर्व धर्माचे नेते राज्यभर दौरा करताना आपण पाहतो परंतु सत्तेची चावी हातात असणारे अथवा विधानसभा , विधानपरिषद , राज्यसभा लोकसभा प्रतिनिधी राज्यभर दौरा करून समाजाच्या अडचणी समजून घेत नाहीत आणि समाजाला दिलासा सुद्धा देत नाहीत. सर्व लोकप्रतिनिधींनी ह्यावर विचार करून अंमलबजावणी करावी .सादिकभाई शेख यांनी मांडलेल्या मुद्द्याला बहुतांशी सर्वांनीच सहमती दर्शवली.महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या स्वंयसेवी संस्था, एन गी ओ यांची मुंबई येथील इस्लामिक जिमखाना येथे चिंतन बैठक mmnf चे अध्यक्ष जाकिरभाई शिकलगार यांनी आयोजित केली होती त्यावेळेस सर्व पक्षाचे आमदार व प्रमुख मंडळींना आमंत्रित केले होते .चिंतन बैठकीला आमदार अमीन पटेल , आमदार साजिद खान पठाण , परभणी भाजप अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष मतीन तांबोळी व राज्यभरातून विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.महिला प्रतिनिधी गजाला आपा, डॉ कुरेशी व इतरांनी महिलांच्या समस्या मांडल्या.मारुफ शेख यांनी शिक्षण विषयक मुद्दा उपस्थित केला नागपूरचे रफिक सर यांनी नागपूर दंगलीबद्दल सूचक वक्तव्य केले. चिंतन बैठकीत ७८ विविध मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच अंमलबजावणीत आमूलाग्र बदल दिसतील असे आश्वासन आ अमिन पटेल व आ साजीदखान पठाण यांनी दिले.२०१८ सालापासून mmnf महाराष्ट्रात कार्यरत असून जाकीर शिकलगार साहेबांनी ३ राज्यव्यापी दौरे करुन समाजातून सरकारकडे मागण्यांसाठी उठाव तयार करायचा यशस्वी प्रयत्न केला आणि त्याचेच फळ म्हणजे अल्पसंख्याक विकासासाठी वाढलेला निधी आणि प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्यांक अधिकारी आणि अल्पसंख्याक आयुक्तालय हे होय. सादिकभाई शेख यांनी सुरुवातीला जाकिरभाई शिकलगार यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला आणि टाळ्यांच्या कडकडाटात सर्वांनी जाकिरभाई शिल्कगार यांचे कौतुक आणि अभिनंदन केले.सादिकभाई शेख यांनी १) मुस्लिम विद्यार्थ्यांच्यातील ड्रॉप आउट रेट कमी करण्यासाठी उपाययोजना करणे २) मुस्लिम मुली व महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्कुल कॉलेज आणि स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, वसतिगृह उभे करणे.३) सायबर क्राइम ब्रँचच्या माध्यमातून मुस्लिम समाजावर होणारे हल्ले रोखून एकता अबाधित राखणे ४) प्रत्येक जिल्ह्यात मुस्लिमांसाठी बहुउद्देशीय हॉल जमातखाना बांधणे ५) हेट स्पीच प्रकरणात मुस्लिमांवर कठोर कारवाई होते परंतु इतरांना सूट दिली जाते अश्यावेळेस कायद्याप्रमाणे सर्वांवर एक सारखी कारवाई व्हावी.६) मुस्लिम मोहल्ल्यात ड्रग्स ,नशेचे पदार्थ अगदी सोप्या पद्धतीने उपलब्ध होतात त्यावर प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जावी .विशाळगड ला एक न्याय आणि नागपूरला एक न्याय असे का हा प्रश्र्न उपस्थित करण्यात आला. डॉ अस्लम बारी यांनी प्रास्ताविक व सूत्र संचलन केले. झाकीर शिकलगार यांनी १५ कलमी योजनाची अंमलबजावणी झाली पाहिजे ह्यावर जोर दिला.मुंबादेवीचे आमदार अमीन पटेल , अकोल्याचे आमदार साजीदखान पठाण आंतरराष्ट्रीय शायर नईम फराज यांनी सर्व मुद्दे ऐकून घेत विधानसभा आणि शासकीय पातळीवर योग्य ती पाऊले उचलणार असे आश्वासन दिले. भाजप युवा मोर्च्याचे मतीन तांबोळी यांनी शासन पातळीवर मागण्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.समाजाच्या समस्या ऐकत असताना अकोल्याचे आमदार साजिदखान पठाण अस्वस्थ आणि भावुक झाले. हुडा टेकलोनॉलॉजीचे सदरूल्लाह , ग्लोबलचे अबिदभाई, इसरारभाई, उमैर इब्जी, अल हिदायाचे डॉक्टर साहेब, हसन मुलाणी व महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. मोहसीन शेख, अरिफभाई आणि एड अमीन सोलकर साहेब यांनी परिश्रम घेत उत्कृष्ट नियोजन केले. आभार अरिफभाई यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *