
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. २६/०६/२०२५ ते दि.३०/०६/२०२५ अखेर सातारा जिल्हयातुन मार्गक्रमण करणार असून सदर पालखी सोहळा पुणे जिल्हयातुन सातारा जिल्हयात दि. २६/०६/२०२५ रोजी पाडेगाव, लोणंद येथे प्रवेश करणार असून त्यानंतर लोणंद, तरडगांव, फलटण, बरड या ठिकाणी मुक्काम करुनदि.३०/०६/२०२५ रोजी सोलापूर जिल्हयात जाणार आहे. सदरचा पालखी सोहळा हा निरा लोणंद फलटण मार्गे पंढरपुर रस्त्याने जाणार असलेने तसेच पालखी सोहळयात लाखो भाविक सहभागी होणार असल्याने पालखी जाणारे मार्गावर कोणताही अपघात घडू नये, वाहतुक समस्या निर्माण होवू नये तसेच अनुचीत प्रकार घडु नये याकरीता मी सुधार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३४ प्रमाणे प्राप्त अधिकारान्वये पालखी सोहळयातील वाहनांखेरीज व अत्यावश्यक सेवेतील (पोलीस, रूग्णवाहीका, अग्निशामक वाहने) खेरीज करून इतर सर्व वाहनांना निरा लोणंद पंढरपूर मार्गावर दि.२५/०६/२०२५ ते दि.३०/०६/२०२५ या कालावधीत खाली नमुद केल्याप्रमाणे प्रवेश करण्यास मनाई करीत आहे.१) दि.२५/०६/२०२५ रोजीचे ०६.०० ते दि.२९/०६/२०२५ रोजीचे २४.०० वा. पर्यंत फलटण येथून पुणे, निरा, लोणंद कडे जाणारी वाहतूक बारामती किंवा वाठार स्टेशन येवून पूणेकडे शिरगांव घाटातून वळविणेत येत आह े २) दि.२५/०६/२०२५ रोजीचे ०६.०० वा. पासून ते दि.२८/०६/२०२५ रोजी २४.०० वा.पर्यंत आदर्की फाटा येथून लोणंदकडे येणारी वाहतूक पालखी सोहळयातील येणारे बाहनाखेरीज इतर वाहनांना बंद करणेत येत आहे. ३) दि.२५/०६/२०२५ रोजीचे ०९.०० पासून ते दि.३०/०६/२०२५ रोजीचे १३.०० वा. पर्यंत लोणंद येथून फलटणकडे जाणारी वाहतूक आदकी मार्ग फलटणकडे वळविण्यात येत आहे.४) दिनांक २५/०६/२०२५ रोजीचे ००.०० वा. ते दिनांक २९/०६/२०२५ रोजीचे २४.०० वा. पर्यंत फलटण ते लोणंद या मार्गावरील वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे.५) दि.२८/०६/२०२५ रोजीचे ००.०० पासून ते दि.३०/०६/२०२५ रोजीचे १६.०० वा. पर्यंत फलटण ते नातेपुते जाणारी वाहतुक पुर्णपण े बंद करण्यात येत आहे.६) दि.२८/०६/२०२५ रोजीचे ००,०० पासून ते दि.३०/०६/२०२५ रोजीचे २४.०० वा. पर्यंत नातेपुते कडुन पुणे बाजुकडे जाणारी वाहतुक माळशिरस, अकलुज येथुन बारामती मार्गे पुण्याकडे वळविण्यात येत आहे.७) दि.२८/०६/२०२५ रोजीचे ००,०० पासून ते दि.३०/०६/२०२५ रोजीचे १६.०० वा. नातेपुते कडुन फलटण मार्ग साताराकडे जाणारी वाहतुक शिंगणापुर तिकाटणे मागे दहीवडी-सातारा अशी वळविण्यात येत आहे. नातेपुते कडुन पुण्याकडे जाणारी वाहतुक नातेपुते-दहीगाव-जांब-बारामती वळवण्याचा आली आहे.