
सातारा शहरातील RTO कार्यालय परिसरात सातारा नगरपालिका यांच्याकडून दिव्यांगांसाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे. दरम्यान दिव्यांगांसाठी आरक्षित केलेल्या जागा दिव्यांगांनी दुसऱ्यांना भाड्याने दिल्या आहे. या परिसरात सगळ्यांनी टपऱ्या सुरू केल्या आहेत या मध्ये काही जणांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण देखील केली आहेत. काल रात्रीच्या सुमारास याच RTO परिसरातील टपऱ्या अज्ञात चोरट्यांनी फोडल्या आहेत. हजारो रुपयांचे नुकसान या मध्ये झाले आहे. दरम्यान चोरट्यांनी गॅस शेगडी, सिलेंडर, सिगारेटची पाकिटे, स्टीलच्या भांड्यांसह काही टपऱ्यांमधील मुद्देमाल चोरट्यांनी साफ केला आहे. RTO कार्यालय परिसरात असणाऱ्या टपऱ्यांच्या मालकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे पोलिसांनी योग्य कारवाई करण्याची मागणी स्थानिक व्यावसायिकांकडून होत आहे.