कर्नल राजमन्नार यांचे साताऱ्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सातारा येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय येथे सातारा जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सैन्य दलातील अधिकारी पदावर भरतीसाठी विविध संधी या विषयावर कर्नल राजमन्नर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. याप्रसंगी कर्नल राजमन्नर यांनी सैन्य दलात अधिकारी होण्यासाठी विविध परीक्षांची तयारी तसेच एसएसबी इंटरव्यू साठी आवश्यक असणारे कौशल्य याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा असून येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने सैन्यात अधिकारी व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सर्व महाविद्यालयांमध्ये अकरावी तसेच पदवी प्रथम वर्षाचे प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली असून या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त तरुणांनी एनसीसी या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. कर्नल राजमन्नर सध्या २२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी साताराचे कमांडिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. कार्यक्रमाप्रसंगी बटालियनचे प्रशासकी अधिकारी लेफ्टनंट कर्नल आनंद सिंग यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. गणेश जाधव होते. डॉ.विजय कुंभार, डॉ. टी.डी. महानवर, कॅप्टन केशव पवार लेफ्टनंट गणेश चोरगे, सुभेदार संभाजी शिंदे कार्यक्रमास उपस्थित होते. डीजे कॉलेजचे एनसीसी अधिकारी कॅप्टन डॉक्टर राजशेखर निलोलू यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट्सनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *