उंब्रज पोलीस स्टेशनचे API रविंद्र भोरे यांच्या टिमची दमदार कामगिरी

प्रतिनिधी गौरव खवळे : उंब्रज पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 70/25 या दाखल गुन्ह्यामध्ये अज्ञात आरोपीत याने फिर्यादी यांचे बंद घरात प्रवेश करून चांदीचे दोन छल्ले तसेच एचपी कंपनीचा लॅपटॉप चोरी करून नेलेबाबत गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याचे अनुषंगाने गुन्ह्याचा तपास करत असताना उंब्रज पोलिसांना गोपनीय बातमीदारांमार्फत सदर गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी संकेत संतोष चव्हाण वय 20 वर्षे राहणार लक्ष्मी नगर उंब्रज यांने केले असलेबाबत माहिती मिळाल्याने संशयित आरोपीतास शिताफीने ताब्यात घेऊन आरोपीकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता आरोपीने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपीतास अटक करण्यात आलेली असून आरोपीताकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले दोन चांदीचे छल्ले तसेच hp कंपनीचा लॅपटॉप असा 36 हजार रुपये चा पूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड, श्री अमोल ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उंब्रज पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी एपीआय रवींद्र भोरे, पीएसआय रमेश ठाणेकर, पोलीस हवालदार सचिन मुळे, संजय धुमाळ, दिनेश भोसले, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पवार,श्रीधर माने, मयूर थोरात, राजू कोळी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *