मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासाठी 11 सप्टेंबर रोजी कार्यशाळा

मुख्यमंत्री समृद ्ध पंचायतराज अभियानाची उद्दिष्टे व अंमलबजावणीबाबत माहिती देण्यासाठी 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायं. 5 या वेळेत जिल्हास्तरीय कार्यशाळा होणार आहे.पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा घेण्यात येईल.अभियानाची संकल्पना, उद्दिष्टे, पंचायत व ग्रामस्तरावरील उपक्रम, जबाबदाऱ्या व कार्यपद्धती याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार असून नेहरू युवा केंद्र, भजनी मंडळ, वारकरी मंडळ, पाणी फाउंडेशन व समाजप्रबोधन संस्था यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *