वीरांगना प्रतिष्ठान व आईसाहेब नवरात्र उत्सव मंडळ यांच्या वतीने लक्ष्मी टेकडी येथे येथे नवरात्र उत्सवानिमित्त होम मिनिस्टर चा कार्यक्रम संपन्न

नवरात्र उत्सवानिमित्त वीरांगना प्रतिष्ठान, सातारा व आईसाहेब नवरात्र उत्सव मंडळ लक्ष्मी टेकडी यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मी टेकडी येथे होम मिनिस्टर चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे सादर करते संजय बोरुडे यांनी विविध खेळ घेत, महिलांशी गप्पा गोष्टी करत भरपूर मनोरंजन केले. यामुळे उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भरोसा सेलच्या पोलीस उपनिरीक्षक काटकर मॅडम, देशमुख मॅडम, आदर्श महिला पतसंस्थेच्या चेअरमन सौ. धनश्री महाडिक, विधानसभा प्रमुख शिवसेना शिंदे गट, सामाजिक कार्यकर्ते बबलू सोलंकी, उपस्थित होते दरम्यान दीपक प्रभावळकर लिखित शिवतीर्थ हे पुस्तक देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. एस के मेटल यांच्या वतीने मिक्सर देण्यात आला. एन आर. एस एंटरप्राइजेस यांच्या वतीने कुकर देण्यात आला. यांच्यावतीने गॅसची शेगडी देण्यात आली. याप्रसंगी वीरांगना प्रतिष्ठानच्या संस्थापिका-अध्यक्षा गौरी आवळे, समन्वयक सुचित्रा कडाळे, पदाधिकारी, आईसाहेब नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *