कर्ज माफी, ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी खटाव तहसील कार्यालयासमोर उबाठा गटाच्या शिवसेनेचे कांदा फेक आंदोलन

खटाव : शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याच्या पिकाला ज्यादा हमीभाव द्यावा अशी मागणी करीत खटाव तहसील कार्यालयावर कांदा फेक आंदोलन आज शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख प्रताप जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. अतिवृष्टी मुळे शेतकऱ्याच्या पिकाचे झालेल्या नुकसानीमुळे खराब झालेली पिके थेट खटाव प्रशासनाच्या दारात टाकण्यात आली. यावेळी खटाव तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले.दरम्यान निवेदन देण्यासाठी आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी खटाव महसूल विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. आज शेतकऱ्यांसाठी आंदोलन होत असताना तालुक्याच्या तहसीलदार बाई माने या जाग्यावर नाहीत, त्यांना शेतकऱ्यांचे दुःख समजत नाही का असा सवाल प्रताप जाधव यांनी व्यक्त केला . Bite : प्रताप जाधव ( जिल्हा प्रमुख शिवसेना ( शेतकरी सेना ) सातारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *