संगम माहुली येथे छठ पूजेचा भक्तिमय सोहळा उत्साहात संपन्न

संगम माहुली येथे छठ पूजेचा महोत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. नदीकाठच्या निसर्गरम्य वातावरणात उगवत्या सूर्यदेवतेला अर्घ्य अर्पण करत असंख्य भाविकांनी आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. महिलांनी पारंपरिक पोशाख परिधान करून घाटावर पूजन करताना परिसर भक्तीमय झाला होता.या पवित्र प्रसंगी श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले (राणीसाहेब) यांनी पूजास्थळी उपस्थित राहून छठ पूजेत सहभाग घेतला. त्यांनी पारंपरिक विधीपूर्वक सूर्यदेवतेला अर्घ्य अर्पण केले व उपस्थित भाविकांना शुभाशिर्वाद दिले. तसेच पूजास्थळी आलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसरात भक्ती, आनंद आणि ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले.या सोहळ्याला माजी नगरसेवक श्री. राम हादगे, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांच्या उत्साही सहभागाने आणि सूर्यदेवतेप्रती अर्पणाच्या भावनेने या छठ पूजेला विशेष आकर्षण प्राप्त झाले.सूर्यदेवतेप्रती अर्पण, समाजातील एकात्मतेचे दर्शन आणि श्रद्धेचा उत्सव — या सर्वांचा संगम या छठ पूजेत अनुभवायला मिळाला. संगम माहुलीतील हा दिव्य सोहळा श्रद्धा, संस्कृती आणि भक्तिभावाचे प्रतीक ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *