
सातारा पुसेगाव : श्री सेवागिरी महाराज रथोत्सव १८ डिसेंबरला
पुसेगाव येथे लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या श्री सेवागिरी महाराजांचा रथोत्सव १८ डिसेंबरला होणार आहे. तसेच ७८ वे यात्रा प्रदर्शन १४ ते २४ डिसेंबरदरम्यान मोठ्या उत्साहात भरवले जाणार आहे, अशी माहिती मठाधिपती १०८ श्रीमहंत सुंदरगिरी महाराज आणि ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ यांनी दिली.
४ डिसेंबरपासून दुकानांच्या जागांचे आरक्षण सुरू होणार असून डिपॉझिट पावतीशिवाय जागा दिली जाणार नाही. कार्यक्रमांमध्ये झेंडा मिरवणूक, क्रिकेट स्पर्धा, शूटिंग-वॉलीबॉल स्पर्धा, हिंदकेसरी बैलगाडी शर्यत, निकाली कुस्त्या, राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, कबड्डी, मॅरेथॉन, बँड महोत्सव आणि श्वान शर्यत अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.
यात्रेचा मुख्य दिवस १८ डिसेंबर, यावेळी श्री सेवागिरी महाराजांच्या पादुका आणि प्रतिमेची भव्य रथ मिरवणूक काढली जाणार आहे. २४ डिसेंबरला बक्षीस वितरण करून यात्रेचा समारोप होईल.