
सातारा पालिका निवडणुकीत भाजपमधून लढण्याची अनेकांची इच्छा होती. मात्र जागा मर्यादित असल्याने सर्वांना संधी देता आली नाही. त्यामुळे पक्षातून अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्यांनी तात्काळ अर्ज मागे घ्यावा, अन्यथा पक्षांतर्गत कारवाई होईल, असा कठोर इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला. या पत्रकार परिषदेला खा. उदयनराजे भोसले, धैर्यशील कदम, सुनील काटकर, दत्ताजी थोरात, विठ्ठल बलशेटबार आणि अमोल मोहिते उपस्थित होते शिवेंद्रराजेंनी स्पष्ट केले की, आरपीआयला एक जागा देण्यात आली असून त्यांनी भाजपला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. जिल्ह्यात नगराध्यक्षासह सर्व जागा “विकृ…”(विजयी) करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सुवर्णा पाटील यांच्या भाजप सोडून मविआकडे झालेल्या प्रवेशाबाबत बोलताना त्यांनी म्हटले—
“त्या नाराज होत्या, पण मविआत त्यांना न्याय मिळणार नाही. आघाडीला उमेदवार मिळत नसल्याने त्या तिकडे गेल्या. त्यांनी अर्ज मागे घ्यावा आणि पुन्हा पक्षात यावे.”
भाजपविरोधात उभे राहणाऱ्या पक्षातील अपक्षांवर निश्चितच कारवाई होणार, असे त्यांनी पुनरुच्चारले.युतीतील काही पक्षांनी चर्चा न करता वेगळे अर्ज भरल्याचा उल्लेख करत, “जे आमच्याशी चर्चा करतात तेच सोबत,” असेही शिवेंद्रराजेंनी स्पष्ट केलेभाजप सत्तेत आहे, संधी मोठी आहे सर्व जागा जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावणार आहोत.