नगरसेवकपदासाठी पंकज चव्हाण यांना नागरिकांची पसंती; प्रभाग क्र. १४ मध्ये परिवर्तनाची लाट !

सातारा : प्रभाग क्रमांक १४ मध्ये आगामी नगरसेवकपदाच्या निवडणुकीसाठी पंकज चव्हाण यांच्या उमेदवारीला नागरिकांनी जोरदार पाठिंबा दर्शवला असून, आपल्या हक्काचा आणि आपल्या कामाचा’ भावी नगरसेवक म्हणून त्यांची मागणी जोर धरू लागली आहे. मनोमिलनातून चव्हाण यांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी प्रभागातील नागरिकांमधून एकमुखाने होत आहे. नवी दिशा, नवी ऊर्जा’ घेऊन रिंगणात पंकज चव्हाण यांनी नागरिकांसाठी नवी दिशा आणि नवी ऊर्जा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. शहराच्या संस्कृती व परंपरेला जपणारे, छत्रपती घराण्यावरील निस्सिम भक्ती असलेले चव्हाण हे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. सांस्कृतिक चळवळीमध्ये त्यांचे मोठे योगदान असून, त्यांनी साताऱ्याच्या कलाविश्वात नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे. भाजपचे सक्रिय सदस्य म्हणून, तसेच सांस्कृतिक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांनी राज्यभरात लावणी महोत्सव, तमाशा महोत्सवांसारखे उपक्रम यशस्वीपणे राबवून लोककलेला व्यासपीठ मिळवून दिले. ते किल्ले प्रतापगड प्राधिकरण समितीचे सदस्य असून, किल्ल्याचे संवर्धन आणि पर्यटनवाढीसाठी प्रयत्नशील आहेत. आजवर दुर्लक्षित राहिलेल्या प्रभागाच्या विकासासाठी चव्हाण यांनी ठाम संकल्प केला आहे. त्यांच्या ‘नव्या व्हिजन’मध्ये खालील प्रमुख कामांचा समावेश आहे:
सुंदर बगीचा आणि दर्जेदार वाचनालयाची स्थापना, मजबूत रस्ते व पायाभूत सुविधांचे निर्माण, नागरिकांच्या अडचणी तत्काळ सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना, तरुणांसाठी अत्याधुनिक अभ्यासिका व करिअर मार्गदर्शन केंद्र. प्रभागात अनेक नगरसेवक होऊनही विकासाची ठोस कामे झाली नाहीत. रस्ते, वीज, पाणी आणि स्वच्छतेच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. ‘आपला माणूस, कामाचा माणूस’ म्हणून पंकज चव्हाण यांच्या उमेदवारीवर नागरिकांनी विश्वास दर्शवला आहे. ‘जय जवान गणेशोत्सव मंडळा’च्या माध्यमातून त्यांचा प्रभागात मोठा जनसंपर्क आहे.
राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले (राणीसाहेब), आणि बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात काम करण्याची इच्छा चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *