
सातारा शहरात मतदानाला सुरुवात होताच एक अनपेक्षित अडथळा निर्माण झाला आहे.प्रभाग क्रमांक १६ मधील बूथ क्रमांक २, आझाद कॉलेज मतदान केंद्रावर वोटिंग मशीन अचानक बंद पडल्याची घटना घडली.मशीनवर “ऑपरेशन इनव्हॅलिड” असा एरर संदेश दिसताच मतदान प्रक्रिया काही काळासाठी अडथळ्यात आली. यामुळे मतदानासाठी लांबच लांब रांगा लागल्या आणि मतदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.निवडणूक अधिकाऱ्यांनी तत्काळ नवीन मशीनची व्यवस्था केली असून आता मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
तथापि, या तांत्रिक बिघाडामुळे मतदान प्रक्रियेत महत्त्वाचा वेळ वाया गेल्याची भावना मतदारांमध्ये असून,
संध्याकाळी किमान वीस मिनिटे मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी मतदारांकडून करण्यात येत आहे.साताऱ्यातील मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून, अशा तांत्रिक त्रुटी टाळण्यासाठी कर्मचारी सज्ज असल्याचा दावाही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.