
सातारा जिल्ह्यातील कराडजवळ पुणे–बेंगलोर महामार्गावर आज सकाळी एक मोठा अपघात घडला आहे. नाशिकमधील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील लेट बी. पी. ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांची सहलीची बस तब्बल २० फूट खोल दरीत कोसळली. या बसमध्ये ४० ते ४५ विद्यार्थी तसेच काही शिक्षक प्रवास करत होते. अपघातात अनेक विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना तातडीने कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र घटनास्थळी पोलिस व स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन बचावकार्य सुरू केले आहे.या गंभीर दुर्घटनेविषयीची अधिक माहिती अद्याप येणे बाकी आहे.