निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर : म्हसवडमध्ये मध्यरात्री गाडी तपासणी दरम्यान तणाव

साताऱ्यातील म्हसवड नगरपालिकेच्या निवडणुकीची तापती पार्श्वभूमी… आणि त्याच दरम्यान मध्यरात्री घडलेली धक्कादायक घटना. मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आलेल्या वाहन तपासणीच्या कारणावरून भाजप कार्यकर्ते आणि शरद पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये तणाव चिघळला… आणि यानंतर दोन्ही गट प्रत्यक्ष समोरासमोर भिडले.”

“मंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवार गटाचे डॉ. सौरभ सावंत यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे सर्व प्रकार पोलिसांसमोरच घडल्याचे समोर आले आहे. मध्यरात्रीच झालेल्या या मारहाणीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. मात्र एवढा मोठा वाद-तणाव आणि आरोप-प्रत्यारोप झाले असतानाही…म्हसवड पोलिस ठाण्यात मात्र अद्याप कोणतीही घटनेची नोंद झालेली नाही.”

निवडणुकीच्या तोंडावर वाढलेला राजकीय तणाव आणि पोलिसांसमोरच घडलेल्या प्रकाराची नोंद न होणे—यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पुढे याबाबत काय कारवाई होते. आणि निवडणुकीवर याचा काय परिणाम होतो. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *