
प्रतापगड पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची गाडी आंबेनळी घाटातील शंभर फूट खोल दरीत ; कार मधील पाच प्रवासी जखमी; महाबळेश्वर ट्रेकर्स आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना काढण्यात आले आहे.
महाबळेश्वर मध्ये आलेल्या पर्यटकांची कार प्रतापगड पाहण्यासाठी जात असताना आंबेनळी घाटात वळणाचा अंदाज न आल्याने शंभर फूट खोल दरीत गेली यामुळे कारमधील पाच पर्यटक जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर पोलीस आणि महाबळेश्वर ट्रेकरची टीम घटनास्थळी दाखल झाली.आणि जखमींना शंभर फूट खोल दरीत अडकलेल्या गाडीतून जखमी अवस्थेत टीमने रेस्क्यू करून रुग्णालयात दाखल केले.
या अपघातात गाडीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.