आजपासून ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : सातारानगरी साहित्यप्रेमीच्या स्वागतासाठी सज्ज..

आखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून आजपासून सारस्वत आणि साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. तब्बल ३३ वर्षांनंतर साताऱ्यात साहित्यिकांचा आनंदमेळा भरत असल्याने सातारकरांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

शतकाकडे वाटचाल करणारे हे संमेलन नवीन संकल्पना आणि आधुनिक मांडणीसह होत असून मराठी साहित्याच्या इतिहासात नवे पान जोडणारे ठरणार आहे. नव्या रितीरिवाजांचे पडत, हे संमेलन अधिकाधिक दर्जेदार आणि संस्मरणीय व्हावे, यासाठी आयोजकांसह साताऱ्यातील प्रत्येक नागरिक चांगले प्रयत्न करत आहे. संमेलनात परंपरागत चवीचे भोजन साहित्यिकांचे करणार आहे. विशेष निमंत्रित साहित्यिकांची खास ठेवण्यात आली असून, त्यांना चांदीच्या ताटात भोजन देत मराठ्यांच्या राजधानीत गोड कौतुक केले जाणार आहे.

ना. शिवेंद्रराजे भोसले, स्वागताध्यक्ष काय म्हणाले – ”मराठ्यांची राजधानी असलेल्या ऐतिहासिक सातारा नगरीत साहित्यिक आणि साहित्यप्रेमी यांचे संमेलनाचा स्वागताध्यक्ष या नात्याने स्वागत करतो. या संमेलनाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण सातारा जिल्ह्याचे तसेच साहित्य प्रेमींचे लक्ष लागलेले आहे साताऱ्याच्या नावलौकिकाला साजेसे असे यंदाचे संमेलन होईल, असा विश्वास आहे”.

कार्यक्रम रूपरेषा : –

गुरुवारी पहिला दिवस :- (ध्वजारोहण,ग्रंथप्रदर्शन,काविकट्टा,गझलकट्टा,प्रकाशनकट्टा ) शुक्रवार दुसरा दिवस :- (उत्सव शब्दांचा ,उद्घाटन समारंभ ,कविसंमेलन,संवाद बाल-कुमार वाचकांशी,नाटक -शिकायला गेलो एक) शनिवार तिसरा दिवस :- (कथाकथन,साहित्य विचारमंथन पर्व,पुस्तक चर्चा ,हास्य जत्रा) रविवार चौथा दिवस :- (स्मरणीय सांगता सोहळा,पुस्तक चर्चा,कविसंमेलन-२,संवाद लक्षवेधी कांदबरीकारांशी ,समारोप, फोक आख्यान)

तर सातारकर मोठ्या संख्येने सामील व्हा,आणि हो सर्वाना प्रवेश फ्री आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *