सातारा जिल्हा परिषद निवडणुकीआधीच :महायुतीतील समीकरणं पुन्हा एकदा चर्चेत..!

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत राजकारण तापताना दिसत आहे. आमदारांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घेऊन ,प्रत्येक आमदारांनी स्वताच्या मतदार संघासाठी निर्णय घ्यावेत. या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री उपस्थित होते.

महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्यांना थेट इशारा देत. आमदार महेश शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे, लोकसभेला खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात आणि विधानसभेला महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात काम करणाऱ्यांना आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत तिकीट दिलं जाणार नाही, असा ठाम इशारा आमदार महेश शिंदे यांनी दिला आहे.

जिल्हा परिषद निवडणूक महायुतीमधून एकत्र लढण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.खासदार उदयनराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत आमचं ट्युनिंग उत्तम असून, लोकसभा आणि विधानसभेला आम्ही एकत्र बसून प्रामाणिकपणे काम केलं असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं.

ज्यांनी निष्ठेने महायुतीसाठी काम केलं, अशा कार्यकर्त्यांना तिकीट देण्याचा आमचा आग्रह राहील.मात्र, पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांसाठी महायुतीत कोणतीही जागा नसेल, असा स्पष्ट संदेश आमदार महेश शिंदे यांनी दिला आहे.

या इशाऱ्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीआधीच महायुतीतील समीकरणं पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *