चिंचणेर वंदन येथे ढगफुटी सदृश्य पावसामुळे बाजार पटांगणावर आलेल्या पुराच्या पाण्यात उभी केलेली चार चाकी वाहने जेसीबीच्या मदतीने काढली बाहेर

जेसीबी चालकाचे होतय कौतुक

सातारा जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे यामध्ये सातारा तालुक्यातील ग्रामीण भागातील चिंचणेर वंदन परिसरातील गावांमध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे ओढे नाले भरून वाहू लागले… यावेळी चिंचणेर वंदन येथील ओढ्याला 25 वर्षांनी एवढा मोठा पाऊस झाला आणि त्यानंतर अचानक आलेल्या पुरामुळे बाजार पटांगणावर पाणी आल्यामुळे या पटांगणावर लावलेल्या चार ते पाच चार चाकी गाड्या पाण्यामध्ये गेली. यावेळी ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे जेसीबी चालक उमेश राठोड याने तात्काळ जेसीबीच्या मदतीने प्रत्येक वाहन या पटांगणावरून सुरक्षित स्थळी हलवले… यामध्ये आय ट्वेन्टी कार ओढ्यामध्ये आलेल्या पुराच्या पाण्यात थोडक्यात बचावली…. जेसीबी चालकाने या पटांगणावरील सर्व वाहने सुरक्षित स्थळी हलवल्यामुळे जेसीबी चालकाचे सर्वत्र कौतुक होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *