जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्या प्रकरणात एक ट्विस्ट, त्या मांत्रिकाला केली दिल्लीत अटक

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्या प्रकरणात एक ट्विस्ट निर्माण झाल आहे. मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागणाऱ्या महिलेच्या संपर्कात असलेल्या अशोक छोटूलाल शर्मा याला वडूज पोलिसांनी मथुरा लक्ष्मीनगर येथून ताब्यात घेतले आहे. अशोक छोटूलाल शर्मा हा संबंधित महिला संपर्कात घातल्याने काही व्हाट्सअप चॅट पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. अशोक शर्मा या मंत्रिकाच्या सांगण्यावरूनच संबंधित महिलेने मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे तीन कोटी रुपयांची मागणी केली होती. दरम्यान अशोक शर्मा याच्यावर वडूज पोलिसांनी त्याच्यावर नजर ठेवून दिल्ली येथील लक्ष्मी नगर येथे अटक केली दरम्यान वडूज पोलिसांचा याबद्दलचा तपास सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *