महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून साताऱ्यातील इंग्रजी मिडीयम शाळांना निवेदन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र सैनिकांच्या वतीने शाळांमध्ये हिंदी सक्ती करू नये यासाठी पदाधिकाऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात येत आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यात देखील हिंदी सक्ती करू नये यासाठी सातारा जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान सातारा शहरातील शाळांमध्ये हिंदी सक्तीची करू नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष कुमार फाळके, अमोल गरड यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सातारा शहरातील निर्मला कॉन्व्हेंट शाळा, सेंटपॉल शाळेला निवेदन देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार सातारा शहरातील शाळांमध्ये हिंदी सक्तीची करू नये यासाठी विनंती केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *