
कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रवादीचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व मदत पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्यासह पालकमंत्री शंभूराज देसाई यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र यावेळी उद्घाटनासाठी उपस्थित असलेले पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी गाडीतून उतरताच राष्ट्रवादी काँग्रेसवर खोचक टोला लगावला.
“अहो, कुठे आहेत राष्ट्रवादीचे मंत्री? एकही मंत्री नाही… शेवटी शिवसेनाच उपयोगी पडली,” असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्यावर लगावला.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात आज राजकीय वादाला तोंड फुटले आहे. या वक्तव्यामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा निर्माण झाली असून, कराडच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
उद्घाटनाच्या झालेल्या या टोलेबाजीमुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले असल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून या अनुपस्थितीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
या प्रकारामुळे राजकीय घडामोडींवर याचा नेमका काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.