
सातारा जिल्ह्यासाठी एक मोठी आणि ऐतिहासिक घडामोड समोर आली आहे.साताऱ्यात तब्बल ११५ कोटी रुपयांचे “सी-ट्रिपल-आयटी” – म्हणजेच सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि ट्रेनिंग – हे अत्याधुनिक आयटी कौशल्यविकास केंद्र उभारण्याला मंजुरी मिळाली आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव टाटा टेक्नॉलॉजीजकडून राज्य शासनाला सादर करण्यात आला असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना अधिकृत पत्रही देण्यात आले आहे.
लिंब-खिंड, नागेवाडी इथे साकारत असलेल्या नवीन आयटी पार्कसोबत हे केंद्र जोडले जाणार असून, सातारा जिल्ह्याच्या औद्योगिकीकरणाला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी या प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा केला असून, या केंद्रामुळे स्थानिक तरुणांना AI, उद्योग 4.0 आणि आधुनिक टेक्नॉलॉजीमध्ये रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“टाटा टेक्नॉलॉजीजच्या या प्रकल्पामुळे साताऱ्यात तंत्रज्ञानाधारित कौशल्य विकासाची नवी दालने उघडणार असून स्थानिक तरुणांना अत्याधुनिक उद्योग तयार करण्यास मोठी मदत होणार आहे. त्यासाठी टाटा टेक्नॉलॉजीजला आवश्यक ते सहकार्य केले जात आहे. या प्रकल्पासाठी सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल. – ना. शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री “
एकूण ११५ कोटी रुपयांच्या प्रकल्पात —
९७ कोटी ७५ लाख टाटा टेक्नॉलॉजीज देणार,
तर १७ कोटी २५ लाख राज्य शासनाकडून उपलब्ध होणार आहेत.
विशेष म्हणजे — राज्यावर कोणताही अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार नाही.
कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, आसाम आणि चंद्रपूर-गडचिरोली येथे अशाच केंद्रांचे यशस्वी प्रयोग टाटा टेक्नॉलॉजीजने केले असून आता सातारा त्यांच्याच पंक्तीत सामील होत आहे. या केंद्रात अत्याधुनिक प्रयोगशाळा, नवीन तंत्रज्ञानावरील प्रशिक्षण, अपडेटेड अभ्यासक्रम आणि उद्योगांना आवश्यक असे कौशल्य विकसित करण्याची संपूर्ण सुविधा मिळणार आहे.
दरवर्षी जवळपास ३,००० विद्यार्थी येथे प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत.
साताऱ्याच्या उद्योगविश्वासाठी, तरुणांसाठी आणि तंत्रज्ञानाच्या भविष्यासाठी ही निश्चितच एक मोठी संधी ठरणार आहे. “सातारा… तंत्रज्ञानाच्या नव्या युगात प्रवेश करण्यासाठी सज्ज!”
साताऱ्यात तब्बल ११५ कोटी रुपयांचे अत्याधुनिक सी-ट्रिपल-आयटी केंद्र उभारण्याला हिरवा कंदील मिळाला आहे.
टाटा टेक्नॉलॉजीजने सादर केलेल्या या महत्त्वाच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मंजुरी मिळून साताऱ्यात इनोव्हेशन, इन्व्हेन्शन आणि कौशल्यविकासाचे नवे दालन उघडणार आहे.
लिंब-खिंड, नागेवाडी येथे तयार होत असलेल्या नवीन आयटी पार्कला या प्रकल्पामुळे मिळणार आहे आणखी बळ.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे—साताऱ्यातील युवकांना AI, उद्योग 4.0 आणि आधुनिक तंत्रज्ञानाचं प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळणार आहे. अत्याधुनिक प्रयोगशाळा… नव्या तंत्रज्ञानावर प्रशिक्षण… अपडेटेड अभ्यासक्रम…
आणि दरवर्षी ३,००० हून अधिक विद्यार्थ्यांना कौशल्यविकासाची संधी!
कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, आसाम, चंद्रपूर–गडचिरोलीमध्ये यशस्वी ठरलेले टाटा टेक्नॉलॉजीजचे मॉडेल…
आता साताऱ्यातही उद्योगविकासाची नवी कहाणी लिहिणार आहे.
सातारा… नव्या तंत्रज्ञानक्रांतीकडे मोठी झेप!