
कराड प्रतिनिधी – हेमंत पाटील / सातारा जिल्हा चे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशावरून कराड शहर पोलिस ठाणे अधीक्षक राजू तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या कराड शहारा मधे गुन्हे प्रकटीकरण शाखेची आरोपींन विरुद्ध कडक मोहीम राबवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर काल कराड मध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखेने एक दमदार कारवाई केली काल मिळालेल्या मलकापूर येथील गुप्त बातमी दरमार्फत मिळालेल्या माहिती नुसार मलकापूर येथील शिवाजी चौक येथे सराईत गुन्हेगार जीवन मस्के राहणारा 60.शुक्रवार पेठ कराड या रेकॉर्ड वरील गुन्हेगारास एक जिवंत काडतूस सह त्याच्या कडून शिताफीने एक पिस्तूल जप्त करण्यात आले..कराड शहरातील गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सदरची कामगिरीही पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कुडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी कराड राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तशिलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा कराड अशोक भापकर, पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार यो ना संतोष पाडळे, सज्जन जगताप, अनिल स्वामी, संदीप कुंभार, पोशि धीरज कोरडे, अमोल देशमुख ,आनंदा जाधव, मोहसीन मोमीन दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील, मुकेश मोरे, सोनाली पिसाळ यांनी केली आहे