सत्यजित पाटणकरांच्या भाजपा प्रवेशाने मंत्री शंभूराज देसाई यांची होणार कोंडी ?

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित पाटणकर उद्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे मंत्री शंभूराज देसाई यांना आपल्या बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसणार आहे. शरद पवार यांचे पवार यांचे विश्वासू आणि जवळचे सहकारी मानल्या जाणाऱ्या सत्यजित पाटणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी सोडून कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला पण शरद पवारांच्या अडचणीच्या काळात पाटणकर यांनी पवारांची साथ सोडत असल्यामुळे शरद पवारांचा बालेकिल्ला असणाऱ्या साताऱ्यातला मोठा फटका बसणार आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराजे देसाई यांना ही याचा त्रास होईल असं वाटतंय कारण पाटणकर आणि देसाई साताऱ्यातल्या या दोन्ही घराण्यात पूर्वीपासून संघर्ष राहिले त्यात आता पाटणकर भाजपात जाणार असल्यामुळे देसाईंच्या गडाला हादरा बसणार आहे.महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री बाळासाहेब देसाई हे पाटण विधानसभा मतदारसंघातून 1965 पासून ते 1980 पर्यंत निवडून आले त्यावेळी शरद पवारांनी काँग्रेसमध्ये फूट पाडून दोन काँग्रेस केल्या होत्या 1980 च्या विधानसभा निवडणुकीत पवारांनी बाळासाहेब देसाई यांच्या विरोधात पहिल्यांदा विक्रमसिंह पाटणकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं त्यावेळी बाळासाहेब देसाईंची प्रतिष्ठा मोठी असल्यामुळे पाटणकरांचा पराभव झाला पण 1983 साली दुर्दैवाने बाळासाहेब देसाई यांचे निधन झालं आणि पाटणमध्ये पोटनिवडणुका लागून विक्रमसिंह पाटणकर यांना संधी मिळाली त्या निवडणुकीत विक्रमसिंह यांनी मैदान मारलं आणि 1999 पर्यंत सलग निवडून येत राहिले यादरम्यान विक्रम सिंह पाटणकर पवारांचा निकटवर्तीयांमध्ये समजले जाऊ लागले 1999 साली पवारांनी दुसऱ्यांदा काँग्रेस पक्ष सोडला त्यावेळी सुद्धा विक्रमसिंह पाटणकर हे त्यांच्यासोबतच होते पण तोपर्यंत इकडे देसाई कुटुंबाचं सातारा जिल्ह्यातलं जे वर्चस्व जवळपास संपुष्टात आले होतो पण 1997 साली बाळासाहेब देसाई यांची नातू शंभूराज देसाई हे राजकारणात सक्रिय झाले आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला 1999 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शंभूराज देसाई विरुद्ध विक्रमसिंह पाटणकर अशी लढाई झाली ज्यामध्ये अवघ्या काही मतांनी देसाई यांचा पराभव झाला पण राजकारणात नवके असूनही विक्रमसिंह पाटणकर यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याला तगडी लढत दिली त्यामुळे शंभुराज देसाई यांची राज्यभर चर्चा होऊ लागली. या पुढे 2004 च्या विधानसभा निवडणुकीत शंभूराजांनी विजय मिळवत 22 वर्षानंतर देसाई घरात आमदारकी खेचून आणली. नंतर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत विक्रमसिंह पाटणकर विधानसभा निवडणुकीला उभे होते . या निवडणुकीत पण शंभूराज देसाई यांनी आपला निसटता विजय खेचून आणला. त्यानंतर 2014, 2019 आणि 2024 मध्ये पाटण विधानसभा मतदारसंघांमध्ये शंभूराजेस यांनी आपली जागा घट्ट केली. त्यामुळे सत्यजित पाटणकर यांना जागाच राहिली नाही. दरम्यान सत्यजित पाटणकर यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे मंत्री शंभूराज देसाईंना अडचण निर्माण होऊ शकते अशी पाटण तालुक्यामध्ये चर्चा सुरू आहेत.याची दोन कारण 1. पाटण विधानसभा मतदारसंघात पर्याय निर्माण होण सध्या महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा सुप्त संघर्ष सुरू असल्याची माहिती माध्यमांमध्ये बऱ्याच दिवसांपासून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे सोबत असलेल्या संघर्षावरून त्यांचे निकाकवर्तीय म्हणून समजले जाणारे शंभूराज देसाई यांच्याविरोधात सत्यजित पाटणकरांना ताकद देऊ शकतात. देवेंद्र फडणवीस हे पाटणकर यांना विधान परिषदेवर घेऊ शकतात त्यामुळे शंभूराजांना पाटणमध्येच पर्याय निर्माण होण्याची शक्यता आहे.2. शंभूराज देसाई साईडलाईन होण सत्यजित पाटणकर हे भाजपात प्रवेश करणार आहेत याचा अर्थ त्यांना भाजपमधून काहीतरी ऑफर आली असेल, भाजपमधून त्यांना संविधानिक पद मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती होऊ शकतात जवळच असल्यामुळे त्यांना मीडियामध्ये सुद्धा चर्चा मिळेल आणि चर्चेत राहिले तर शंभुराज देसाई साइडलाईन होण्याची शक्यता आहे. विचार केला तर अजित पवार सुद्धा सरकारमध्ये आहेत आणि अजित पवारांचा एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुप्त संघर्ष जरी असला तरीही अजित पवार आणि शंभूराजे देसाई हे एकमेकांचे जुने काळचे मित्र त्यामुळे अजित पवार देशांना त्यांच्या मतदारसंघात निधी कमी पडू देणार नाहीत. तसेच सातारा जिल्ह्यात 2024 च्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर आमदार निवडून आल्यामुळे आणि दोन मंत्री असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत देखील सत्यजित पाटणकर यांना भाजपा मोठी ताकद देण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *