
देशांमध्ये वाढलेल्या तणावामुळे जगभरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका आणि इस्रायल कडून इराण वर सुरू असलेल्या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर अस्थिरता वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील परदेश पर्यटनावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव सातारकर पर्यटकांनी सर्व आंतरराष्ट्रीय सहली तूर्तास रद्द केल्या आहेत.सातारा जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पर्यटक विदेशवारी करतात.
विशेषतः दुबई, व्हिएतनाम, श्रीलंका, कंबोडिया, भूतान आणि नेपाळ ही प्रमुख पसंतीची पर्यटनस्थळे आहेत.
उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी आगाऊ बुकिंग केले होते. मात्र, सध्याच्या जागतिक परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सुमारे ३८ अधिकृत ट्रॅव्हल्स कंपन्यांनी आपल्या नियोजित सहली स्थगित केल्या आहेत.देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा थेट परिणाम सातारा जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायावर होताना दिसत आहे.अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या निर्णयामुळे पर्यटन क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
साताऱ्यातील बहुतांश ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव सर्व आंतरराष्ट्रीय सहली पुढील आदेशापर्यंत रद्द केल्या आहेत.
1.आखाती देशांतील तणावाचा सातारकर पर्यटनावर परिणाम
2.साताऱ्यातून दुबईसह आंतरराष्ट्रीय टूर रद्द
3.प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य – ट्रॅव्हल्स कंपन्यांचा निर्णय
4.युद्ध निवळल्यानंतरच परदेशवारीचे नियोजन
5.पर्यटन क्षेत्राला आर्थिक फटका
ट्रॅव्हल्स चालकांच्या मते, “प्रवाशांची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वोच्च आहे. परिस्थिती पूर्णपणे शांत झाल्यानंतरच सहली पुन्हा सुरू करण्यात येतील.”