अखेर ठरलं! साताऱ्यात राष्ट्रवादी–शिवसेना एकत्र; जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादीचा दावा,भाजपला विरोधी बाकावर बसवणार?

साताऱ्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट 20 मार्चची डेडलाईन जाहीर होताच.सत्तेच्या समीकरणांना वेग आला आहे.सातारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असा अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी थेट सभेत जाहीर केलं.

जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार असा दावा देखील त्यांनी केला आहे.. मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील एकदिलाने सोबत आहेत… त्यामुळे अध्यक्षपदावर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार.दरम्यान, मंत्री जयकुमार गोरे यांनी या आधी भाजपचाच अध्यक्ष होईल असा दावा केला होता.

यावर त्यांनी टीका केली आहे. असं कोण पण टीव्ही वर काय पण बोलतात.मात्र राष्ट्रवादीच्या जिल्हाअध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी केलेल्या आक्रमक घोषणेनंतर साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

20 मार्चच्या आधी नेमकं कोणाचं पारडं जड ठरणार?

साताऱ्याची सत्ता कोणाच्या हाती जाणार? सत्तेच्या या थरारक लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

सत्तेच्या या थरारक लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *