साताऱ्यातील गोडोली येथे धनलक्ष्मी लॉजिंगच्या नावाखाली कुंटणखाना

सातारा : सातारा-कराड रोडवर सातारा शहरानजीक एका हॉटेलच्या बाजूला असलेल्या इमारतीत लॉजींगच्या नावाखाली चालू असलेल्या कुंटनखान्यावर सातारा पोलीसांनी धाड टाकून कारवाई करावी अशी मागणी गोडोलीतील काही ग्रामस्थ करु लागले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहराजवळील धनलक्ष्मी लॉजवर कुंटनखाना सुरु असल्याचे समोर आले आहे. दरम्यान या लॉजिंगवर काही राजकीय पदाधिकारी व युवक विचारणा करण्यासाठी गेले असता, त्यांना संबंधित लॉजिंगवर काही अल्पवयीन मुली व परराज्यातील मुली आढळून आल्या. लॉजिंगच्या व्यवस्थापनाला जाब विचारला असता त्यांनी खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दीली असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत अधिक चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.

उद्याच्या भागात : रहिमतपूर ते रेवडी व्हाया गोडोलीचे लॉजिंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *