कॉलेज रोडच्या अपघातानंतर उंब्रज पोलिस ॲक्शन मोडवर

उंब्रज / प्रतिनिधी गौरव खवळे : उंब्रज ता. कराड येथील कॉलेज रोडवर झालेल्या  दूचाकी अपघातानंतर उंब्रज पोलिस ॲक्शन मोडवर आले आहेत. विनालायसन्स, विनाहेल्मेट,ट्रीपल सीट, दारू पिऊन वाहन चालविणे यासह वाहतूकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई बडगा उगारून उंब्रज पोलिस ॲक्शन मोडवर आले आहेत.उंब्रज येथील सेवा रोड तसेच कॉलेज रोडला अस्ताव्यस्त पार्किंग यासह व्यवसायिकांनी फूटपाथवर केलेले अतिक्रमण या पार्श्वभूमीवर वारंवार अपघात यासह वाहतूक कोंडीला सामोरे जाण्याची वेळ येत असल्याने नागरिकांच्या तक्रारीवरून उंब्रज पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. बुधवार दि.१५ रोजी सपोनि रविंद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल हेमंत पाटील, मधुकर मांडवे,अनिल देशमुख, रवींद्र चव्हाण  महिला पोलिस कॉन्स्टेबल सुनिता पवार यांनी संयुक्तरित्या कारवाई करून कॉलेज रोड बसस्थानक परिसर तसेच पाटण तिकाटणे येथे १५ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. यामध्ये १२ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत. वाहतूकीस अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे आवाहन उंब्रज पोलिसांनी केले आहे.फोटो ओळ:उंब्रज बसस्थानक परिसरात वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करताना उंब्रज पोलिस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *