
सातारा प्रतिनिधी | सातारा नगरपरिषदेतील नगरसेविका सौ. हेमलता सागर भोसले यांनी शाहूनगर प्रभाग क्र. १९ मधील विविध प्रलंबित कामांबाबत प्रशासनाकडे ठोस आणि तातडीची मागणी करत लेखी पत्र दिले आहे. ४ मार्च २०२६ रोजी दिलेल्या या पत्रामुळे परिसरातील विकासकामांना वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंगळाई कॉलनीतील रस्ता कामात बदलाची मागणीनगरसेविका भोसले यांनी मेघाबाई कोंबडी येथील पावसाळी ड्रेनेज व रस्ता कामासाठी मंजूर झालेल्या अंदाजे ३९ लाख ४४ हजार रुपयांच्या कामात आवश्यक ते बदल करण्याची मागणी केली आहे. सद्यस्थितीत गटारांची अवस्था अत्यंत खराब असून, प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा दर्जा सुधारावा व उर्वरित निधीतून सक्षम व टिकाऊ काम करावे, अशी त्यांची भूमिका आहे. नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने नियोजन करण्यावर त्यांनी भर दिला आहे.
शाहूनगरमध्ये CCTV कॅमेरे बसवण्याची मागणीसुरक्षेच्या दृष्टीकोनातून शाहूनगर प्रभागातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचीही त्यांनी मागणी केली आहे. यामध्ये –अजिंक्यतारा किल्ला व चारभिंतीकडे जाणारा परिसरचारभिंतीजवळील पाण्याच्या टाकीजवळमेघाबाई कोंबडी येथील मुख्य रस्तापॅरेंट्स स्कूल परिसर (गोळीबार मैदान रस्ता)जगदंब चौकरामराजे पवार नगर मुख्य रस्ता या ठिकाणी तातडीने कॅमेरे बसवावेत, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे
प्रभागातील रस्ते, ड्रेनेज आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर नगरसेविकेने घेतलेली भूमिका सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे. प्रभागातील वाढत्या वर्दळीमुळे आणि सुरक्षेच्या गरजेमुळे ही मागणी अत्यंत योग्य असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.आता प्रशासनाकडून या मागण्यांवर कितपत आणि किती लवकर कार्यवाही होते, याकडे शाहूनगरकरांचे लक्ष लागले आहे.