
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तोंडावर भाजपच्या पाटणकर गटातील सरपंच संघाचे उपाध्यक्ष संदीप जाधव यांच्यासह पदाधिकारी सरपंच,उपसरपंच आणि 400 कार्यकर्त्यांचा शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत तसेच, भाजपचे सत्यजित पाटणकर यांच्या गटाला मोठा धक्का, पाटणकर गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश केला आहे.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर मोठे पक्षप्रवेश शिवसेनेत होत आहेत. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील सरपंच संघाचे उपाध्यक्ष संदीप जाधव यांच्यासह भाजपच्या पाटणकरांचे सरपंच, उपसरपंच पदाधिकारी 400 कार्यकर्त्यांसह त्यामध्ये महिला कार्यकर्त्या सुद्धा उपस्थितीत होत्या. यावेळी मंत्री शंभुराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने पाटण ढेबेवाडी येथे कार्यकर्ते संवाद मेळावा घेण्यात आला.
यावेळी मंत्री शंभूराज देसाई बोलताना म्हणाले की,
“भाजपमध्ये गेलेल्या पाटणकरांच्या कार्यपद्धतीला कंटाळून व शिवसेनेकडून सुरू असलेल्या विकासकामाने प्रभावित होऊन शेकडोंच्या संख्येत कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेनेत येत आहेत.”
या पक्षप्रवेशामुळे पाटण तालुक्यातील आगामी निवडणुकीमध्ये निर्णायक ताकद आपणास मिळेल तसेच, शिवसेनेचा ग्रामीण भागातील प्रभाव अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.