बावधन बगाड यात्रा २०२६ : काळभैरवनाथाचं चांगभलं..रंगपंचमीला ऐतिहासिक बगाड यंदाचा बगाड्या मानकरी ‘विठ्ठल सोपान कदम’

वाई तालुक्यातील बावधन गाव… जिथे भक्ती आणि परंपरेचा एक अनोखा संगम पाहायला मिळतो. काळभैरवनाथाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात, पण सर्वांचे लक्ष असते ते ‘बगाड्या’ कोण होणार याकडे!

होळीच्या रात्री काळोखात, जेव्हा मंदिराचे पुजारी देवाला कौल लावतात, तेव्हा अख्ख्या गावाची धडधड वाढलेली असते. यंदा हा कौल मिळालाय विठ्ठल सोपान कदम यांना. ही केवळ एक निवड नाही, तर एका भावाच्या प्रेमाची आणि अढळ श्रद्धेची ही कहाणी आहे. आपल्या आजारी भावासाठी विठ्ठल यांनी २०१० मध्ये नवस केला होता. बंधूंची प्रकृती सुधारली आणि विठ्ठल कदम यांनी नाथांच्या चरणी स्वतःला अर्पण करण्याचा संकल्प केला.

येत्या रविवारी, ‘काशीनाथाचं चांगभलं’च्या जयघोषात विठ्ठल कदम बगाडावर स्वार होतील आणि भक्तीची ही परंपरा पुन्हा एकदा दिमाखात साजरी होईल.

मित्रांनो, तुम्ही बावधनचं बगाड पाहिलंय का? सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा ! यंदा या यात्रेचा मानकरी ठरलाय एक जिद्दी शेतकरी – विठ्ठल सोपान कदम.

विठ्ठल यांनी २०१० मध्ये आपल्या भावाच्या आरोग्यासाठी नवस केला होता. २०१३ पासून ते दरवर्षी कौल लावत होते. आणि अखेर या वर्षी, ६१ जणांच्या स्पर्धेत नाथांनी त्यांना कौल दिला!

रंगपंचमीला, म्हणजेच ८ मार्चला ही भव्य मिरवणूक निघणार आहे.

तुम्ही येणार का बावधनला? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि म्हणा – काशीनाथाचं चांगभलं!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *