सातारा जिल्हा परिषद देशभर चर्चेत : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या कामगिरीचे पंतप्रधानांकडून विशेष कौतुक….

पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर सातारा जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या कामगिरीचे पंतप्रधानांकडून विशेष कौतुक.
सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी जिल्हा परिषदेने राबवलेल्या विविध नाविन्यपूर्ण योजना आणि प्रशासनातील बदलांचे प्रभावी सादरीकरण केले. त्यांच्या या सादरीकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष कौतुक केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून सातारा जिल्ह्यात विकासाचा वेग वाढला आहे. दुर्गम भागांना प्रत्यक्ष भेटी देत नागरिकांच्या अडी-अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी ठोस पावले उचलण्यात येत असून मॉडेल स्कूल, मॉडेल अंगणवाडी, स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे यांसारख्या योजनांची राज्य शासनाने दखल घेतली असून हे उपक्रम आता राज्यभर राबवले जात आहेत.याशिवाय जिल्ह्यात महिला बचत गटांची चळवळ वेगाने वाढवण्यात आली असून, या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचे काम सातारा जिल्हा परिषद करत आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या कार्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली जात आहे. केरळमधील कोवलम येथे झालेल्या राष्ट्रीय परिषदेत याशनी नागराजन यांना प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या परिषदेत डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशासन व शासकीय सेवांमध्ये होणाऱ्या बदलांवर सखोल चर्चा करण्यात आली.

तसेच कर्नाटकातील बेंगलुरू येथे नीती आयोगाच्या राष्ट्रीय कार्यशाळेत सांडपाणी प्रक्रिया व पुनर्वापर विषयावर सादरीकरणासाठी त्यांना प्रमुख वक्ता म्हणून निमंत्रण देण्यात आले होते. नवी दिल्लीतील पुसा येथे २६ ते २८ डिसेंबरदरम्यान आयोजित पाचव्या राष्ट्रीय मुख्य सचिव परिषदेतील सादरीकरणातूनही सातारा जिल्हा परिषदेचे नाव देशभर पोहोचले आहे.पायाभूत सुविधा, सीएसआर निधीचा वापर, गुणवत्ता वाढ, सुरक्षा, क्रीडा, सौर ऊर्जा आणि शाळांची पटसंख्या वाढ यासंदर्भातील माहिती स्लाईडशोद्वारे सादर करण्यात आली.

या सर्व सादरीकरणांमुळे सातारा जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची नोंद थेट राजधानी दिल्लीत घेण्यात आली असून, सातारा जिल्ह्याचा नावलौकिक पुन्हा एकदा देशभर पसरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *